Breaking News

आम आदमी पार्टी स्थापनादिनाचे औचीत्य साधून चिमूर विधानसभेत ‘गाव तिथे आप’ अभियानाची आजपासून सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-सर्वसामान्यांचा आवाज, सर्वसामान्य जनतेची, जनतेच्या हक्कासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनातून उभी राहलेली आम आदमी पार्टी च्या १० व्या स्थापनादिनाचे औचीत्य साधून चिमूर विधानसभेत आप चे विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात ‘गाव तिथे आप’ अभियानाची आजपासून सुरुवात होत आहे.

अवघ्या १० वर्षात संपूर्ण देशात वेगाने वाढत असलेली, दोन राज्यात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करून जनतेला मोफत दर्जेदार शिक्षण, मोफत वैधकिय सेवा, मोफत वीज, जुने पेन्शन, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणारी व तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणारी, दिल्ली ला भारताची स्टार्टउप राजधानी बनवून या सर्वात भारताची जगभरातील प्रतिमा उंचावणाऱ्या आम आदमी पार्टी ची सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाची विचारधारा चिमूर विधानसभेतील प्रत्येक घरात पोहचविण्याच्या उद्देश्याने आम आदमी पार्टी चे पदाधिकारी व स्वयंसेवक गावोगावी जाऊन जनतेशी संपर्क करून पार्टी ची शाखा स्थापित करणार आहेत.

‘गाव तिथे आप’ अभियान यशस्वी करण्यासाठी चिमूर व नागभीड तालुक्यातील आपचे पदाधिकारी विलास दिघोरे, योगेश सोनकुसरे, आदित्य पिसे, विशाल इंदोरकर, सुरेशजी कोल्हे, मंगेश शेंडे, अनिल धारणे, मंगेश वांढरे, प्रमोद भोयर, नानक नाकाडे, सौ. संगीता तर्वेकर, सौ. विद्या तुमराम, अर्चना रगडे, सौ. दामिनी करकाडे, अक्षय आमले, निरंजन बोरकर, प्रमोद भोयर, कन्हेय्या नान्हे, मुकेश मसराम, दिगंबर कनकावार, प्रवीण चयकाटे, जयेन्द्रा भांदक्कर, प्रतिभा शास्त्रकार, राधेश्याम ठाकरे, विलास शास्त्रकार, राकेशकुमार गुप्ता व इतर स्वयंसेवक उस्फुर्तपणे जबाबदरी पार पाडीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved