
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई:-आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासह आसाम सरकारच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहा सहकारी मंत्रीदेखील उपस्थित होते.
आसाम आणि महाराष्ट्र राज्यातील उद्योग, व्यापार, दळणवळण, पर्यटन आणि परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावेत तसेच महाराष्ट्रात आसाम भवन आणि आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारून दोन्ही राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जवळ यावीत याबाबत देखील या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने खास प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात खंबीरपणे साथ दिल्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा यासमयी खास श्री गणेश मूर्ती देऊन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सन्मान करून त्यांचे आभार व्यक्त केले.
राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, समन्वयक आशिष कुलकर्णी, आसाम मंत्रिमंडळातील मंत्री केशव महंत, मंत्री चंद्रमोहन पतवाडी, मंत्री उरखाऊ गोडा ब्रम्हा, मंत्री रंजित कुमार दास, मंत्री डॉ रनुज पेगो, आसाम सरकारचे शिक्षण सल्लागार नानी गोपाल महंता, मंत्री जयंता मलना बरुआ तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.