
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी धडकले
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील चारगाव, अर्जुनी, दादापूर, चारगाव बुजरुग, राळेगाव, बेंबाळ,अकोला, धानोली व इतर गावातील शेतकऱ्यांनी HDFC अग्रो इन्शुरन्स कंपनी कडून पीक विमा काढला होता , दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले तरी पंचनाम्या नुसार शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हडा मोबदला मिळाला नाही,
त्यामुळे कृषी अधीक्षक व HDFC अग्रो इन्शुरन्स कंपनीला शेतकऱ्यांनी विचारणा केली असता पंचनाम्या नुसार खात्यावर त्वरित पैसा जमा करावी व वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे विमा क्लेम प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारीसाहेब चंद्रपूर यांच्याकडे निवेद्वाना द्वारे केली.
त्यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, जेष्ठ शिवसैनिक बंडु डाखरे, सुधीर नन्नावरे,बंडू बोढणे, राहुल जुमडे,अनिल लोंढे,अभिजीत पावडे,दशरथ देहारकर, जितू थुल,सचिन डुकरे,दुर्गेश पावडे, अरविंद मोरे, गणेश नागेकर, अमोल चिकटे, भारत ठक, विठ्ठल खाडे,संदीप खाडे, दयारामजी ननावरे, सुभाष एकरे,सिद्धार्थ गायकवाड,गणेश पावडे, सुधाकर झाडे, मुकेश गुगल, कवडु लोडे,अनिल शिरसागर, जगन आडकिने, अविनाशभाऊ डाहुले,अविनाश डाहुले,विलास कष्टी, शरद कष्टी,समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.