Breaking News

कृषी प्रधान देशात चालले तरी काय ?

शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी सत्ताधार्‍यांना काही देणे घेणे नाही- विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:- शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ता नाही.कृषी प्रधान देशात चालले तरी काय लोकप्रतिनिधींसह सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांचे प्रश्न आणि विकासकामाशी काही देणे घेणे राहीले नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या नुसत्या घोषणा केल्या. शेतकर्‍यांची सातत्याने फसवणूक करणार्‍यांना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे .असे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी केले. मातोश्री पांदण रस्ता चे चिमूर तालुकयातील पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करा.मातोश्री पांदन रस्ते योजना आहे.

तरी कोणासाठी शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात,नुसते बोलून चालत नाही.योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.शेतकरी पुत्र विनोद उमरे.चिमूर तालूक्यातील ग्रामीण भागातील पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यात यावे.चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस ,धान उत्पादक शेतकरी बांधवाना शेतीची विविध कामे करण्यासाठी पांदन रस्ता वरुन आवागमन करावे लागत आहे.

परंतु सदर बरेच रस्ते कच्चे असल्याने सोयाबीन, कापूस धान, उत्पादक शेतकरी बांधवाना शेतावर ये-जा करण्यासाठी शारिरीक, मानसिक भावनिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सकृतपने दिसून येत असून पावसाळ्यामध्ये तारांबळ उडत असते पांदन रस्ताच्या समस्येमुळे शेतीची कामे करण्यास विलंब होत असतो. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गाव निहाय पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करुन सोयाबीन, कापूस ,धान, शेतकरी यांना दिलासा होतील त्यामुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पांदन रस्ते खडीकरण डांबरीकरण करण्यात यावे .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved