Breaking News

1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास

गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय),चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होतांना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यादृष्टीने दि. 1 ऑक्टोबर 2023 पासून रुग्णालयात रुग्णास दाखल करतांना संबंधित रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकास पास वितरित करण्यात येणार आहे.

या पासच्या आधारे रुग्णांच्या नातेवाईकास रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच रुग्णास भेटण्याची व रुग्णासोबत थांबण्याची परवानगी देखील देण्यात येणार आहे. विनाकारण रुग्णालयामध्ये गर्दी होऊ नये, याकरीता नागरीकांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved