Breaking News

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी खुशाल वानखेडे यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी खैरी येथील खुशाल वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि 13/10/2023 ला बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे एक दिवसीय भव्य असे पत्रकार संमेलन घेण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते खुशाल वानखेडे यांना प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली,

यावेळी अरूण राऊत संपादक निर्मल विदर्भ, अविश बन्सोड जिल्हा प्रतिनिधी निर्मल भारत,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रत्नपाल डोफे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, जिल्हा प्रसिद्ध धर्मपाल माने, डि. के. हनवते उपाध्यक्ष यवतमाळ, राळेगाव शेतकरी संघ तालुका अध्यक्ष नानाजी येणोरकर, तसेच बाभुळगाव व राळेगाव तालुक्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी हजर होते.

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे यांच्य नियुक्तीमुळे आनंदी वातावरण निर्माण झाले आहे तर नवनियुक्त अध्यक्ष यांनी सांगितले की मी संघाचा प्रोटोकॉल पाळुनच कामकाज करणार व वरिष्ठांना मान सन्मान देवून व सर्वाना सोबत घेऊन काम करणार तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर विद्युत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल रोकडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने चंदू मडकवार यांनी …

स्मार्ट मिटर सक्तीला लावा लगाम वडकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) ने दिले निवेदन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- महाविजवितरण कंपनीने स्मार्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved