Breaking News

बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय पत्रकार संमेलन संपन्न

पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ व जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या सहभागातून बाभुळगाव येथे एक दिवसीय भव्य पत्रकार संमेलनाचे आयोजन महल्ले सभागृह येथे शुक्रवार 13 आक्टोबर रोजी करण्यात आले. या पत्रकार संमेलनाचे आयोजन जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वगामि पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम हे होते. तर उदघाटन साप्ताहिक धम्मसंदेशचे संपादक धर्मपाल माने यांनी केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी महिला संघाच्या जिल्हा कोषाध्यक्षा सुजाता रत्नपाल डोफे, निमंत्रक जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रीय विश्वगामी कामगार संघ जिल्हाध्यक्ष सम्यक म्हैसकर, व्यवस्थापक संजय शेळके तालुकाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी कामगार, सहव्यवस्थापक दिलिप गाडगे तालुकाध्यक्ष राष्ट्रीय शेतकरी संघ बाभूळगाव तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती पत्रकार मा.अरुण राऊत, जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया संपादक संघ यवतमाळ, संपादक निर्मल विदर्भ. वाशिम संदेश. साप्ता. लक्षभेद. प्रमुख अतिथी म्हणून प्रफुल्ल मेश्राम महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, दै.विदर्भ निर्मल चे जिल्हा प्रतिनिधी अविनाश बनसोड, कृ.ऊ.बाजार समिती संचालक आशिष सोळंके, उपाध्यक्षा वंदना म्हैसकर, मिलिंद पडोळे, संजय भैसे, दादाराव हनवते, पिंपरीचे पोलीस पाटील राजू डोफे, बेबीबाई डोफे वर्षा वाकोडे तालुका ध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी महिला संघ बाभूळगाव संध्या नैताम तालुकाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी कर्मचारी संघ बाभूळगाव उपस्थित होते.


सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते महा पुरुषांच्या प्रतीमेंचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी केले. संचालन राळेगाव तालुका सचिव शशीम कांबळे यांनी तर आभार कल्याणी डोफे यांनी मानले. यावेळी मान्यवरांनी पत्रकारीतेच्या समस्या व प्रश्न या विषयावर विचार मंथन व मार्गदशन करण्यात आले.या प्रसंगी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलतांना म्हणाले की.जिल्ह्यांतील पत्रकारांच्या. कामगार. शेतकरी. शेतमजूर. सुशिक्षीत बेरोजगार अंगणवाडी सेविका मदतनीस.आशा वर्कर गवंडी बांधकाम कामगार. विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडून सोडविण्यात येईल याची गाव्ही त्यांनी दिली.

या संमेलनामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ व जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनाच्या वतीने पत्रकार आरिफ ली, राजू नवाडे, शहेजाद शेख, प्रवीण लांजेकर, विक्रम बऱ्हाणपूरे, संजय कारवटकर, शशीम कांबळे, खुशाल वानखेडे, उमेश कांबळे, असलं शेख, गणेश हिवरकर, सुरज ढाले, अरविंद कोडापे, अजय जुमनाके, पंचगव्हान सरपंच माधवी धोटे, ग्रामसेविका एम.बी. पवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेश खडसे, प्रगतीशील शेतकरी नानाजी येरोणकर, यांचेसह शेतकरी, शेतमजूर, कामगार, समाजसेवक, रुग्णसेवक, विद्यार्थी, महिला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय शेळके, दिलीप गाडगे, फिरोज खा पठाण, विष्णू राऊत, गजानन काकडबारी, प्रशांत नैताम, शैलेश भगत, राम देवघरे, रमेश मेश्राम, संघपाल डोफे, धर्मपाल डोफे, मोनाली डोफे, प्रगती गाडगे, प्रेमिला बोबडे, राजू बोथाडे, गोपाल बोबडे, प्रदीप नंदपटेल, चेतन डफळे, सुधाकर दांडेकर आदींनी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved