Breaking News

राळेगाव येथे तालुकास्तरीय तृणधान्यावर आधारित पाककृती व रांगोळी स्पर्धा संपन्न

शिक्षण विभाग पंचायत समितीचा अभिनव उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ/राळेगाव:-शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव द्वारा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्यावर आधारित पाककृती स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आज दिनांक ११ ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद कन्या शाळा राळेगाव येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन . केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव , कार्यक्रमाचे अध्यक्ष अमीत भोईटे तहसीलदार तहसील कार्यालय राळेगाव प्रमुख अतिथी सरला देवतळे गटशिक्षणाधिकारी पं.स.राळेगाव,. चंद्रभान शेळके विस्तार अधिकारी(शिक्षण) अमोल जोशी तालूका कृषी अधिकारी धांदे पाहूणे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे परिक्षक ममता राऊत व सारीका बनकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक महेश सोनेकर मुख्याध्यापक जि.प. कन्या शाळा राळेगाव व कु स्वप्नाली पिसाळकर शापोआ डाटा एन्ट्री ऑपरेटर राळेगाव यांनी केले.

या कार्यक्रमाला सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी जवनांचा आस्वाद घेण्यात आला . जिल्हा परिषद कन्या शाळा राळेगाव येथील त्यांच्या सर्व टीमने कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या केले. सर्व सहभागी स्पर्धक,शिक्षक व आमंत्रित पाहुण्यांसाठी जेवणाची सुंदर अशी व्यवस्था केली. स्पर्धेमध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले.
1.प्रथम क्रमांक जी प कन्या शाळा खैरी.
2. दुसरा क्रमांक जी प शाळा झुल्लर
3. तिसरा क्रमांक जी. प उच्च प्राथिक शाळा लोणी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved