Breaking News

फुटपाथ वाचनालय – रमेश मेश्राम, संचालक यांची एक अनोखी संकल्पना व पुस्तक प्रेमींना आवाहन

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या-कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: मुलुंड पूर्वे ला असलेल्या, खंडोबा मंदिर चौका मध्ये, “रंग कौशल्य कट्टा” नावाची एक 24 तास उघडे ग्रंथालय आहे . हे ग्रंथालय 24 तास, दिवस रात्र उघडे असते. तेथे कोणाची देखरेख नसते.तेथे कोणीही ग्रंथपाल नसतो.वॉचमन नसतो.

 

हजारो पुस्तके विविध भाषेची पुस्तके, विविध प्रकारातील पुस्तके उदा. कथा, कादंबरी, वैचारिक, बाल- वाड़:मय, धार्मिक अशी सर्व प्रकारातील पुस्तके तिथे उघड्या फळ्यांवर उपलब्ध आहेत, म्हणजेच कुणी या कुणीही पुस्तके घेऊन जा, अश्या पद्धतीची पुस्तके इथे उपलब्ध आहेत आणि अनेक लोक सर्व “मुंबई कर” आम्ही जर बोललो तर ते आम्हाला बोलावतात आणि पुस्तके दान देतात. आणि आम्ही मुलुंड, ठाणे कल्याण पवई, अंधेरी जोगेश्वरी, गोरेगांव, बोरिवली, दादर, फोर्ट, गिरगांव कुलाबा या सर्व भागातले लोक आम्हाला बोलवतात. त्यांच्याकडे आमचा मोबाइल नंबर आहे. फेसबूक व्हॉटसअॅप, यू-टयूब वर आम्ही आहोत आणि एकाच दिवशी आम्ही सर्व पुस्तकासाठी या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, आणि पुस्तके जमा करून आम्ही इथे ठेवतो. आणि इथे ठेवल्यानं ज्यांना जे पुस्तके हवे आहे ते लोक इकडे येतात आणि पुस्तके घेऊन जातात, वाचतात, परत देतात.

गेल्या वर्षभरापासून आम्ही विविध भाषांतील हजारो पुस्तकांचा लाभ नागरिकांनी आणि विद्यार्थ्यानी घेतला आहे. बहुतेक करून केळकर कॉलेज,वी पी एम कॉलेज व आय.टी. आय चे विद्यार्थी तसेच मुलुंड ईस्ट वेस्ट आणि या भागात काम करण्यासाठी येणारी जनता या लायब्ररी चा लाभ घेतात.

परंतू पुस्तके घेऊन गेल्यावर लोक ते परत करण्याच प्रमाण हे अत्यल्प आहे त्याच्यामुळे पुस्तके ही संपत असतात. म्हणून आम्ही पुनश्च नागरिकाना एक विनंती करतो की कृपया आम्हाला पुस्तके दान करा .

थोडी पुस्तके असतील तर इथे घेऊन या. जास्त असतील तर आम्हाला कळवा .आम्ही तुमच्या घरी येऊ आणि पुस्तके आमचे कार्यकर्ते गोळा करून घेवून येतील..

तुम्हाला विनंती आहे कृपया पुस्तके दान करा,
आणि ही बातमी तुमच्या व्हाटसअप/टेलिग्राम ग्रुप वर टाका, म्हणजेच याचा जास्तीस जास्त प्रसार होऊ शकतो आणि लहान मुलांना किंवा आपल्याला जे इंटरनेट जे 24 तास आपण वापरत असतो त्यातून थोडे बाहेर येऊन पुस्तकांच्या मध्ये रमण्याचा थोडा विचार करू या, वाचनाची संस्कृती वाढवू या.

आणि मित्रांनो आमच्या ह्या कृतीला तुम्ही कृपया हातभार लावा आणि पुस्तके दान करा असे कळकळीचे आवाहन श्री रमेश मेश्राम,
संचालक ☎️ मोबाईल नंबर 9819 22 11 77 यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved