Breaking News

जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाहीची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत निवेदन

व्हॉईस ऑफ मिडीया तालुका चिमूरच्या वतीने जाहीर निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार यांनी भ्रमणध्वनीव्दारे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संजय पडोळे यांनी पोलीसांत तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकाश मारकवार यांचेवर कठोर कारवाईची मागणी करीत व्हाईस ऑफ मिडीया चिमूर तालुकाच्या वतीने घटनेचा निषेध नोंदविला आहे.काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना दिलेली धमकी ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असुन पत्रकार आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावुन घेणारी असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर नेत्याकडुन झालेल्या बेकायदेशीर कृत्याचे व्हॉईस ऑफ मिडीया चिमूर तालुक्यातील सर्व पत्रकाराणी जाहीर निषेध नोंदविला आहे.

सोबतच काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांचेवर फौजदारी गुन्हयाची नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी चिमूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय घाडगे. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेशकुमार जाधव, यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके. सचिव भरत बंडे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीहरी सातपुते, राम चिचपाले, सुनील कोसे, रामचंद्र कामडी, सुरेश नरुले, जितेंद्र सहारे, फिरोज पठाण, प्रमोद राऊत, योगेश सहारे, सुनिल हिंगणकर, शुभम बारसागडे ,समीर बल्की, नरेंद्र नागोशे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved