Breaking News

नगरपरिषद क्षेत्रात ऑनलाईन कामांसाठी नागरिकांची वणवण

नगरपरिषद कार्यालय येथे अतिरिक्त आधार केंद्र व सेतू केंद्र सुरु करण्याची माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांची मागणी

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड 

नागभीड :- नगरपरिषद नागभीड क्षेत्रातील नागरिकांना अनेकदा ऑनलाईन कामांसाठी आधार केंद्र व सेतू केंद्रावर जावे लागते.आणि नागभीड येथे आधार केंद्र व सेतू केंद्राची संख्या हि कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते.महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांचा विचार करून आपल्या इथे आधार केद्र व सेतू केंद्र सुरु केलेला आहे.मग नागभीड नगरपरिषद येथे आधार केद्र व सेतू केंद्र अजून पर्यंत का सुरु झालेले नाही ? असा प्रश्न माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांनी नगरपरिषद प्रशासनाला केला आहे.

त्यातच आता शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी नागरिकांना होणारा त्रास वाचविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नगरपरिषद कार्यालयात लवकरात लवकर आधार सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने सचिन आकुलवार यांनी केलेली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved