Breaking News

शेतकऱ्यास दमदाटी करून धमकावण्याचा प्रयत्न

नेरी शहर व्यापारी असोसिएशन चा मनमानी कारभार

सर्वे नंबर वेगळा आणि फलक वेगळ्याच शेतजमिनीवर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.०१/०७/२०२४ ला शेतकरी सुरेश कृष्णाजी बुढे यांच्या वडिलोपार्जित स्व मालकीच्या शेतजमिनीवर बळजबरीने नेरी शहर व्यापारी असोसिएशन ने मौजा नेरी भूमापन क्रमांक.१८ क्षेत्र १.२४ हे आर चौ.मी. भोगवटदार वर्ग १ असलेल्या जमिनीवर अनाधिकृत पद्धतीने जमिनीचे नकाशेवाचन न करता दुसऱ्याच शेतकऱ्यास नाहक त्रास देत दमदाटी करीत लोखंडी फलक लावून भूमिपूजन केले.फलकावर लिहिलेल्या सर्वे नंबर प्रमाणे हि शेतजमीन गवत पठाची नसून ओलित विहीर तसेच इलेक्ट्रीक पंप असलेले शेत आहे.

आणि रब्बी मध्ये गहू व खरीप मध्ये भात हे पिक घेतले जाते.असे असतांना देखील नेरी शहर व्यापारी असोसिएशन चा मनमानी कारभार सुरूच आहे.शेतकरी सुरेश कृष्णाजी बुढे यांचे म्हणणे व्यापारी असोसिएशन ऎकून घ्यायला तयार नाही.तर अनाधिकृत पद्धतीने लावण्यात आलेल्या लोखंडी पक्क्या फलकावर केलेले लिखाण सुद्धा चुकीचे दिसून येत आहे. भूमापन क्रमांक. ७ हि जमीन मौजा नेरी याठिकानीच दुसरीकडे असून सरकार झुडपी जंगलाची आहे.

व या गावनमुना सात अधिकार अभिलेख पत्रकात कुठेही नेरी शहर व्यापारी असोसिएशन संकुलनाची नियोजित जागा असा उल्लेख केल्या गेला नसून दुसऱ्यांच्या शेतात लावलेल्या फलकावर सदर जागा हि व्यापारी संकुलनाची नियोजित असून या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये व केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाही करण्यात येईल आदेशांन्वये अध्यक्ष मंगेश एस चांदेकर असे लिखाण करून सर्रास गुंडगिरी पद्धतीची टिप लिहिल्या गेली असल्याने वर्षोनुवर्षे वडिलोपार्जित शेतजमीन हिसकावण्याचा प्रयत्न या व्यापारी असोसिएशन चा दिसून येत असल्याने शेतकरी सुरेश कृष्णाजी बुढे यांच्या परिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved