Breaking News

‘लाडकी बहीण योजनेत’ व्यस्त शेतकरी मात्र चिंताग्रस्त

निंदणासाठी महिला मजूर मिळेना

तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड

नागभीड :- दर महिन्याला १ हजार ५०० रुपये मिळावे याकरिता सर्वत्र अर्ज प्रक्रियेत सध्या शहरी तसेच ग्रामीण भागात ‘लाडकी बहीण’ व्यस्त आहे. त्यामुळे शेतामध्ये निंदणासाठी मजूर मिळेनासे झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
यावर्षी सुरुवातीला पावसाने दगा दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. काहींना दुबार पेरणी करावी लागली. सध्या अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे.

त्यामुळे शेतीकामात शेतकरी गुंतले आहे. सध्या पिकांमध्ये हरळी, केणा आगाहा, गाजर गवत यांसह विविध प्रकारचे तणकट उगवले आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांद्वारे निंदण करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात महिला व्यस्त आहे. त्यामुळे निंदणासाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या डोकेदुखी वाढली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved