Breaking News

हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेत आमदार म्हणुन पाठवण्याचे अभिवचन द्यावा हाच खरा अभिष्टचिंतन सोहळा – अझहर शेख

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा चिमूर विधानसभा क्षेत्रांत चिमूर येथील अभ्यंकर (मैदान) किल्ला परीसरात हजारोंच्या संख्येने नागरीकांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी अभिष्टचिंतन कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष म्हणुन चंद्रपूर जिल्हयाचे भाजपा नेते प्रकाश देवतळे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा आशिष देवतळे, भाजपा प्रदेश सदस्य वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे,भाजपा प्रदेश युवा मोर्चा सचिव मनिष तुमपल्लीवार, भाजपा युवा नेते समीर राचलवार, भाजपा नेते डॉ. शाम हटवादे, मजहर शेख, नीलम राचलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम डुकरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय नवघडे, ओमप्रकाश गणोरकर, प्रकाश वाकडे, डॉ. देवनाथ गंधारे, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा चिटणीस तथा चंद्रपूर जिल्हा समन्वयक (शहर व ग्रामीण) माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर ममता डुकरे, एकनाथ थुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य गीताताई लिंगायत, विनोद चोखरे,माया नन्नावरे,गोपाल बलदुआ,प्रवीण गणोरकर, संदीप पिसे,दिगंबर खलोरे,किशोर मुंगले,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी मंचावरून बोलताना माजी पंचायत समिती सदस्य अजहर शेख यांनी उपस्थित नागरीकांना संबोधित करताना सांगितले की, आमदार बंटी भांगडिया यांनी विरोधकांनी जेवढे साठ वर्षात विकास केला नाही. त्यापेक्षा काही पटीनी आमदार बंटी भांगडिया यांनी मागील १० वर्षात विकास कामे केलीत आणि करत आहेत. याच विकासाची मुहर्तमेढ आमदार बंटी भांगडिया चिमूर विधानसभा क्षेत्रात पुढे नेत आहेत. त्यामुळं या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त आपल्या क्षेत्राचे विकासपुरुष आमदार बंटी भांगडिया यांना समोरील दोन महिन्यांत होणाऱ्या निवडणूकीत भरभरून मत रुपी आशीर्वाद द्याल हाच खरा अभीष्टचिंतन सोहळा खरा ठरेल असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.यावेळी आश्रम शाळेला कॉम्पुटर भेट म्हणुन देण्यात आला शेकडो विद्यार्थ्यांना सायकल वितरीत केले तर शेकडो महिलाना शिलाई मशीन वाटप करण्यात आले यासह विविध साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन जयंता गौरकार यांनी प्रास्ताविक अजहर शेख यांनी तर आभार एकनाथ थुटे यांनी मानले.

यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ थूटे, समिर राचलवार, नेते भाजपा युवा मोर्चा, बंटी वनकर शहर अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, श्रेयस लाखे शहर महामंत्री, रोशन बनसोड, गजानन जाभुळे, सागर भागवतकर, करण चवरे, नरेंद्र हजारे, गोलू मालोदे, विक्की कुरेकार, हर्षल डुकरे, अमीत जुमडे, गोलू भरडकर, नितेश दोडके, मनी रॉय,सावन गाडगे, मोनू गौरकार, अरबाज शेख, पराग अंबादे, यासह आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला चिमूर परिसरातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved