मुंबई:- परिवहन मंत्री अनिल परब यांची वांद्रेतील कार्यालयाची इमारत म्हाडाने अनाधिकृत असल्याचे सांगत त्यांना यासंबंधीत नोटीस बजावण्यात आली आहे. यावर भाजपाकडून त्याच्यावर वारंवार टिका केली जात आहे,मात्र याविषयी बोलताना अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म्हाडाने दिलेली नोटीस चुकीची आहे,मी त्या जागेचा मालक नाही,नोटीस मालकाला पाठवायची असते,म्हाडाने मला का पाठवली आहे कळलं नाही’ अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याचसोबत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कंगना राणावत मी जे काही अनधिकृत बांधकाम केलेले आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे का आता अनिल परब यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे. कंगनाच्या अनधिकृत बांधकामांचे समर्थन असेल तर त्यांनी त्याचं सांगावं. महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर एखादी कारवाई केली तर ती कारवाई करावी की करू नये याबद्दल त्यांनी स्पष्ट सांगावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सोबत रामदास आठवले यांच्याकडे कोणीच आता पाहत नाही आणि कंगनाचा विषय हातामध्ये घेऊन ते स्वतः कडे जनतेचे लक्ष वेधण्याचे काम करत आहे. अशी टीका अनिल परब यांनी रामदास आठवले यांच्यावर केली आहे.