• योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 17 कोटी 48 लाख जमा
• विशेष सहाय्य आर्थिक योजनेत शहरात 1 लक्ष 12 हजार लाभार्थी
नागपूर, दि.12 : विशेष सहाय्य आर्थिक योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेतील 63 हजार 213 लाभार्थ्यांना सुमारे 17 कोटी 48 लाख 65 रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
विशेष सहाय्य आर्थिक योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती योजनांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत शहरातील 1 लक्ष 12 हजार 192 लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या 54 हजार 828 लाभार्थ्यांना 8 कोटी 59 लक्ष 62 हजार 200 रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजनेत 4 हजार 151 लाभार्थ्यांना 72 हजार रुपयाचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.