उपमहापौरांनी केली कोरोना प्रादुर्भावाबद्दल जनजागृती
नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिका-यांनी व ज्येष्ठ नगरसेवकांनी गुरुवारी शहराचे विविध बाजारपेठेत जाऊन कोरोनाच्या वाढता प्रार्दुभावाबद्दल नागरिक व दूकानदारांमध्ये जनजागृती केली.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी मनपाचे पदाधिका-यांना व ज्येष्ठ नगरसेवकांना बाजारपेठेत जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देवून उपमहापौर मनीषा धावडे यांनी गुरुवारी सेंट्रल एव्हेन्यू टेलीफोन एक्सचेंज पासून पारडी पर्यंत जावून नागरिकांना व दूकानदारांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुण्याचे आवाहन केले. त्यांचे सोबत उपद्रव शोध पथकाचे जवानसुध्दा होते. जवानांनी कोव्हिड नियमांचा भंग करणा-यांविरुध्द कारवाई केली. नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेण्याची विनंतीसुध्दा त्यांनी केली. हॉटेल, चहा टपरी, किराणा दुकान, ज्यूस सेन्टर आदी मध्ये जाऊन त्यांनी नागरिकांना मास्क च्या वापर करणे, हात वारंवार धुणे तसेच सामाजिक अंतर ठेवण्याचे ही आवाहन केले. त्यांचा सोबत लकडगंज झोनच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे व सहाय्यक आयुक्त साधना पाटील होते.
नागपूरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण केल्याने कोरोनाचा मृत्यु दर कमी करण्यास मदत होईल आणि नागपूर कोरोनामुक्त शहराकडे वाटचाल करेल.
केन्द्र शासनाच्या दिशा निर्देशानुसार दिनांक १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील वयोगटाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु झाला आहे. पदाधिकारी व नगरसेवकांनी नागरिकांना याबद्दल माहिती दिली आणि लस घेण्याचे आवाहन केले.