
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत जनकापुर येथील ग्राम पंचायत मध्ये रोजंदारीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचा लाईन दुरुस्त करीत असतांना विद्युत शाॅक लागुन मृत्यु झाल्याची घटना घडली. विनोद बारीकराव शेंडे (४५) रा. जनकापुर असे मृतकाचे नाव असून तो ग्राम पंचायत चा रोजनदारी वरचा विद्युत कर्मचारी होता, काल दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास शेतशीवारातील लाईन बंद असल्यामुळे, संबंधित विद्युत विभागाचा लाईनमन यानी आपल्याला सहकार्य करण्यासाठी विनोदला सोबत घेतला होता, दरम्यान लाईनमन हा डीपीवर फाल्ट बघत होता , आणि विनोदला पोलवर चढून फाल्ट बघायला सांगितलं , लगेच विनोद विद्युत पोलवर चढला आणि अचानक विनोदला विद्युत शाॅक लागल्याने विनोद शेतात खाली पडला , व काही वेळातच विनोदची जिवन जोत मावळली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, माहिती मिळताच नागभीड पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा व उत्तरीय तपासणी करुन प्रेत घरच्यांकडे देण्यात आले, संबंधित विद्युत विभागाने विनोदच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. मृतकाला आई व २ मुली आहेत. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.