Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

शेवगांव पोलिसांची बंदी असलेल्या चायनीज मांज्यावर धडक कारवाई मांजा केला जप्त

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- दिनांक 19/12/2024 वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 18 डिसेंबर बुधवार रोजी गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार शेवगांव शहरातील क्रांती चौक परिसरातील एका दुकानात भारतात बंदी असलेला चायनीज मांजा विक्री साठी आल्याची माहिती मिळताच शेवगांव पोलीस स्टेशन चे पो. हे. …

Read More »

विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतुक नियत्रंण शाखेची कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.18 :- जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये सक्तीचे आहे. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यत दुचाकीचे एकुण 384 अपघात …

Read More »

शेवगांव पोलिसांचा दणका मोडला लाखो रुपयांची फसवणूक करणारांचा मणका रावतळे कुरुडगावं येथील “बोगस गुरुकृपा ट्रेडिंग च्या मास्टर माईंड” आरोपी जेरबंद

शेअर मार्केटच्या नावाखाली ३३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणा-या सखाराम नामदेव ढोरकुले या आरोपीस गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलीसांनी सापळा लावुन केले शिताफीने जेरबंद अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की अवधुत विनायक केदार यांचे फिर्यादीवरुन गुरुकृपा ट्रेडिंग इनव्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली …

Read More »

ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबुन मजुराचा मृत्यू

अवैध रित्या रेती ट्रॅक्टरने वाहतूक करतांना घडली घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी,शिवणपायली जवळ असलेल्या चिखली परीसरात अवैधरित्या रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार वाहतूक सुरु असतांना रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर च्या ट्रॉली वरून उसरून चाकाखाली दबुन मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची माहिती गावाकऱ्यांना मिळताच क्षणी घटनास्थळ …

Read More »

मुकेश जिवतोडे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी वर्णी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- भद्रावती वरोरा विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांना त्यांची जागा दाखवुन दिली असे मुकेश जिवतोडे यांना शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले होते मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा चंद्रपूर जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्याकडे चंद्रपूर व वरोरा विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.   …

Read More »

झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय

‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती विशेष प्रतिनिधी – मुंबई मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!’झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

चंद्रशेखर बावनकुळे यांचा संक्षिप्त परिचय विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी – मौदा विधानसभा चे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली, भारतीय जनता पार्टीचा सदस्य ते भाजपा प्रदेशाध्यक्ष असा ३० वर्षांचा राजकीय प्रवास असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया. • भाजपाच्या जिल्हा ते …

Read More »

विदर्भातील बांबू हस्तकला वस्तूला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

विदर्भातील बांबू उद्योजक व कारागीर समूहासाठी एकदिवसीय कार्यशाळा विदर्भातील विविध जिल्ह्यातून बांबू उद्योजक व कारागीरांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- विदर्भातील बांबू हस्तकलेला जागतिक बाजारपेठ प्राप्त व्हावी, या उद्देशाने चीचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महानिर्देशक विदेश व्यापार कार्यालय नागपूर (डी. जी.एफ.टी.) व हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद (ई. …

Read More »

वन अकादमीत अरुणाचल प्रदेश वनविभागातील वनपालांनी घेतले पायाभुत प्रशिक्षण

45 पुरुष वनपाल तर चार महिला वनपाल प्रशिक्षणार्थींचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- भारतातील विविध राज्यातील वन विभाग तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर येथे सुसज्ज वन अकादमीची निर्मीती करण्यात आली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून …

Read More »

टेमुर्डा येथील दारू दुकानाला परवानगी देऊ नका अन्यथा आंदोलन करू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याकडे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत टेमुर्डा परिसरात बेकायदेशीरपणे सुरेश टिकाराम अहिरकर रा. नांदगाव ता. मुल यांचे देशी दारूचे तथा इतर वाईन शॉपी चे दुकान कुख्यात दारू तस्कर अंजु अन्ना यांच्या माध्यमातून स्थानंतरण केल्या जात असल्याने …

Read More »
All Right Reserved