Breaking News

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे पडोली पोलिसांचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 17 : पोलिस स्टेशन पडोलीच्या हद्दीतील ताडाळी टी-पॉईंट जवळ 1 नोव्हेंबर रोजी एक 35 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. सदर महिला रोडवर झोपली असता व तिला उठवले असता ती कोणतीच हालचाल करीत नसल्याने स्थानिक बारवेटर आकाश ढोक यांनी डायल 112 वर फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता ती महिला मृत अवस्थेत होती. तोंडी फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृतक महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय अंदाजे 35 वर्ष, रंग गोरा, उंची पाच फुट, डोक्याचे केस काळे व लांब, अंगात शेंदरी रंगाची टि-शर्ट व हाप बरमुडा घातलेला असून उजव्या हातावर ओम गोंदलेले आहे.

सदर वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास त्यांनी पोलिस ठाण्यात ओळख पटविण्याचे आवाहन पडोली पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार भुषण टोंग यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

२७ एप्रिल निषेध दिन – शिक्षक भारतीचे शिक्षकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-२७ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात …

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved