Breaking News

शेतकऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या – राळेगाव तालुक्यातील तेजनी येथील घटना

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव

यवतमाळ :-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या तेजनी येथील शेतकरी राजू महादेव हिवरकर वय वर्ष ५० अंदाजे असून काल सकाळी आपली बैल जोडी घेऊन शेतात गेले असता घरी वापस न आल्याने घरच्या लोकांनी व गावातील नागरिकांनी राजू हिवरकर चा शोध घेतला पण तो कुठेच आढळून आला नाही.  त्यामुळे मुलगा सचिन व गावातील काही लोक  शेतात गेले असता शेतात असलेल्या गोठ्यात राजू महादेव हिवरकर हे दोरी द्वारे फासी असलेल्या अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच गावातील इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली हि माहिती राळेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन प्रेताचा पंचनामा करून उत्तरिय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही पुढील तपास राळेगाव पोलीस करित आहे म्रुतकाच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असाआप्त परिवार आहे अशी माहिती म्रुतकाच्या परिवाराकडून प्राप्त झाली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved