Breaking News

वाळु चोरांनी काढले पुन्हा डोके वर तालुक्याच्या पश्चिम भागात रात्रीची वाळु चोरी जोमात

शेवगाव तहसीलदार छगन वाघ यांची अवैध वाळु उपसा करणा-या ढंपरवर कारवाई

प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
मो.9960051755

शेवगांव:-शेवगांव चे तहसीलदार छगन वाघ यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरवर दोन दिवसांपूर्वी नेवासा रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर कारवाई केली. वाळूने भरलेला ढंपर शेवगाव नेवासा रोडवर जात असल्याची माहिती शेवगाव तहसीलदार यांना समजली. त्यानंतर तहसीलदार यांनी तलाठी, मंडलाधिकारी, यांना घेवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरचा पाठलाग करून त्या वाहनाला नेवासा रोड वरील महावितरण कार्यालयासमोर अडवून सदर चालकाला याबाबत चौकशी केली असता चालकाकडे कोणत्याही प्रकारचा वाळु वाहतूक परवाना आढळून न आल्याने ते वाहन शेवगाव तहसीलदार यांनी ताब्यात घेवून सदर वाहनाचा व त्यामधे असलेल्या वाळूचा रीतसर पंचामार्फत पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले.

शेवगाव शहर व तालुक्यमध्ये दररोज रात्री २५ ते ३० ढंपरने वाळु व मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका ढंपर मालकाने दिली. तालुक्याच्या पश्चिम भागातील वडुले व सामनगाव परिसरामध्ये धडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे.वडुले व सामनगाव परिसरामध्ये अवैध वाळु वाहतूक मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी चालू आहे. त्यावर शेवगाव तहसीलदार यांच्याकडून धडक कारवाई व्हावी अशी मागणी यां भागातील जनतेतून होत आहे. या परिसरात होत असलेल्या वाळु वाहतुकीला महसुल च्या कर्मचारी वर्गातून अभय मिळत असल्याचीही चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांकडून तहसीलदार शेवगांव यांची दिशाभूल करून ही वाळू वाहतूक बनबोभाट केली जात आहे. यावर तहसीलदार यांनी अँक्शन मोड मध्ये येणे आवश्यक आहे. मागे प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे चाळीस वाहनांवर धडक कारवाई केली होती.

महसूल मधील एका कर्मचाऱ्याच्या तालुक्यातील अनेकांना “मामा” बनवनाऱ्याच्या प्रकरणाच्या अनेक तक्रारी महसुल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार होऊनही अर्थपूर्ण संबंध असलेल्या यां कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तो “बागड बिल्ला’ कोण???

{क्रमशः }

ईनुस प्रकरणात दडलंय काय ???

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिस भरती प्रकियेदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 …

शेवगांव तालुक्यातील एरंडगाब भागवत येथील एक बिग बुल फरार के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून घातला शेकडो लोकांना 25 कोटी रुपयांना गंडा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील भागवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved