Breaking News

पाच जूनला गुणवंतांचा सत्कार समारंभ

कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमीत्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यात वृक्ष , जल, वन्यजीव, पुरातण वास्तू संवर्धन या क्षेत्रात चळवळ निर्माण करणारे , ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारासाठी झटणारे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.बबनराव तायवाडे यांचे निकटवर्ती पर्यावरण प्रेमी व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोमवारी 5 जुन ला ११.०० वाजता गुरुदेव ग्रामविकास मंडळ इंदिरा नगर चिमुर येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक -कृषीभूषण तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक मोरेश्वर झाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष मारोतराव अतकरे,प्रमुख पाहुणे –राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक सौ.ममता डुकरे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक सौ भावना बावणकर, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक सौ.माधुरी रेवतकर , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक विजय डाबरे , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक राजेंद्र लोणारे , पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य अमोद गौरकार उपस्थित राहणार आहेत .तरी सर्व जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यावरण संवर्धन समीती चिमुर, भिसी, नेरी,कडून करण्यात येत आहे.

“सत्कारमूर्ती”

अरविंद राऊत, साईश वारजूकर,शालू घरत , पंकज घाटे ,अपुर्वा बन्सोड ,शुभम पसारकर ,तेजल बोरकर , मुन्ना शेख,वैभव ठाकरे , प्रमोद राऊत , फिरोज पठाण, विकास खोब्रागडे ,प्रणाली भुजाडे ,अंजली भिमटे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved