Breaking News

निकृष्ठ दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करा

अभिजित कुडे यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-उखर्डा गावातील रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.अवघ्या दोन ते तीन महिन्यातच हे रस्ते पूर्ण उकळले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची व्हिजेटीआय आथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासणी करुन संबधीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी अभिजित कुडे यांनी केली आहे. उखर्डा रोड मध्ये भ्रष्टाचार प्रकार उघडकीस आले आहेत. या संदर्भात अभिजित कुडे यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.
अभिजीत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, उखर्डा गावातील रस्त्यावर जवळपास 100 मीटर लांब रस्त्याचेकाम5 महिने आधी झाले आहे.

सदरचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. पावसाळ्याआधीच केलेला हा रस्ता पूर्ण उखडला आहेत गिट्टी बाहेर निघाली आहे. ठेकेदाराने हा रस्ता किती निकृष्ठ पद्धतीने केला आहे, याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हिजेटीआय आथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, ठेकेदाराने केल्या जाणार्‍या निकृष्ठ कामांबाबत चौकशी करुन त्याची माहिती लेखी स्वरुपात जाहीर करावी; अन्यथा, प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यात येईल,असा इशाराही अभिजित कुडे यांनी दिला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved