Breaking News

सेल्फीच्या नादात चार तरुण तलावात बुडाले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/नागभीड:-नागभीड पासून जवळच असलेल्या घोडाझरीच्या तलावात चार तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. मनीष श्रीरामे वय वर्ष २६, धीरज झाडे वय वर्ष २७, संकेत मोडक वय वर्ष २५, चेतन मांदाडे वय वर्षे १७ असे तलावात बुडालेल्या तरुणांचे नावे असून सेल्फी काढण्याच्या नादात ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील घोडाझरीच्या तलावाची पाण्याची पातळी वाढल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. रविवार असल्याने शेगाव येथील आठ तरुण पार्टीसाठी घोडाझरी तलाव येथे आले होते. घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण घसरुन पडला. त्याच्या पाठोपाठ तिन तरुण बुडाले. सोबत असलेल्या तरुणांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तलावात बुडालेल्या तरुणांचा शोध घेत असून पुढील कारवाई सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved