Breaking News

दारुड्याचा भर ग्रामसभेत धिंगाणा – नागरिकांना सभेतून जावे लागते परत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारुड्यानी धिंगाणा घातल्याचा लाजिरवाणा प्रकार दिनाक २ मार्च रोजी शनिवार दुपारी ११:०० वाजेच्या सुमारास घडला, सावरी गट ग्राम पंचायत मध्ये गावातील विकास हिशोबाकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेत काही लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला,ग्राम पंचायत समितीचे सदस्य कर्मचारी उपस्थित असतांनाही असा लाजिरवाणा प्रकार घडला आहे.

 

जो व्यक्ती ग्राम सभेत दारू पिऊन धिंगाणा करेल त्यांना नोटीस बजावा असे गावातील सुज्ञ नागरिकांनी सांगितले असून देखील हाच प्रकार निरंतर घडत आहे.ग्राम सभेत दारू पिऊन धिंगाणा घालत असलेल्या व्यक्तीला ग्रामसेवक व सरपंच व सदस्य यावर पाठराख करतात की काय अशी शंका येते आज झालेला सर्व प्रकार शोशल मिडीयावर शेअर झाला आहे धिंगांना करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केंव्हा होते याकडे गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved