Breaking News

बंदर येथील खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ 

यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन राळेगाव अंतर्गत येत असलेल्या बंदर येथील उंकडा शिवराम जांभुळकर याला माणिक विलास जांभूळकर याने गंभीर जखमी केले अशी फिर्याद प्रमोद उंकडा जांभुळकर रा बंदर यांनी दि २३/३/२०२४ ला पोलिस स्टेशन राळेगावला दिली सदर फिर्यादीवरून राळेगाव पोलिस स्टेशनी अपराध क्रमांक १४४/२४ कलम ३२४,३२६,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०६,३५ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील जखमी उंकडा जांभुळकर हा गंभीर जखमी असल्याने त्यास उपचारासाठी पाठवलेले असताना तो आज दि २४/३/२४ रोजी मृत्यू पावला व सदर कलमामध्ये ३०२ भादवि प्रमाणे समाविष्ट करण्यात आले, गुन्ह्यातील मुख्य आरोपी माणिक विलास जांभूळकर वय ३८ रा बंदर हा गुन्हा दाखल झाला.

तेव्हा पासून पसार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती प्राप्त झाली होती सदरचा आरोपी हा गुन्हयातील मुख्य आरोपी असल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने आरोपीच्या शोधा करिता गोपनीय बातमीदार कडुन माहिती घेतली असताना सदर आरोपी हा सोनखास जंगलात असल्याची माहिती मिळाली या वरुन पथकाने क्षणाचाही विलंब न करता माहिती प्रमाणे जोडमोह परिसरातील सोनखस या गावाच्या परिसरातील जंगलात शोध घेण्याकरिता रवाना झाले असता शोध कार्य सुरू असतानी आज आरोपी विलास माणिक जांभूळकर रा बंदर ता राळेगाव आढळून आला व त्याला ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाई करिता पोलिस स्टेशन राळेगाव यांच्या ताब्यात देण्यात आले .

सदरची कारवाई ही डॉ पवन बन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ,पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, आधारसिंग सोनेने पोलिस निरीक्षक स्थान. गु .शा यवतमाळ रामकृष्ण जाधव पोलिस निरीक्षक राळेगाव यांच्या मार्गदर्शनात अमोल मुडे सोपोनि , पोलिस अंमलदार योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिंदुरकर,रंजनीकांत मडावी, निलेश राऊत, सर्व स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ व पोलिस स्टेशन राळेगाव येथील पो अंमलदार रत्नपाल मोवाडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved