जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- बोलेरो महिंद्रा पिकअप वाहन क्र,एम.एच-१0 सी.आर-५९५० या वाहनाने देशी दारूची तस्करी करण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या एल.सी.बी.पोलिसांना मिळाली.
गुप्त माहितीच्या आधारे एल.सी.बी. पोलिसांनी बल्लारपूर पेपर मिल समोर सापळा रचुन चंद्रपूर वरून येत असलेल्या बोलेरो महेंद्र पिकअपला अडवून झडती घेतली असता, त्यामध्ये २६ पांढऱ्या बोऱ्यात कांदे व ३४ पांढऱ्या बोऱ्यात अवैध देशी दारू आढळून आले. दारूसाठा व आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणुन दोन्ही आरोपी चालक शुभम प्रमोद मिराशे(२२) बाजूला बसलेला अभिलाष प्रभाकर वैद्य दोघेही राहणार धानोरा, ता, मूर्तिजापूर जी, अकोला यांना ताब्यात घेऊन कलम६५ अ ८३ गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई २३ सप्टेंबरच्या मध्य रात्री १ ते २ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.त्यात १० लाखांची देशी दारू ,९ लाखांची बोलेरो महिंद्रा पिकअप, एक मोबाईल फोन,आणि कांदे असा एकुण रक्कम अंदाजे २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतांना सुद्धा दारूचा अवैध साठा येतोच तरी कशा असे प्रश्न नागरिकामध्ये बोलले जात आहे.
दारू तस्करी करनारे लाँकडाऊनचा फायदा घेत वाहनाचा उपयोग करून दारू पुरवठा करीत आहे, बोलेरो महिंद्रा वाहनात असलेली अवैध रित्या देशी दारू कोणत्या होलसेल दारू विक्रेत्याला देण्यात येत आहे याचा पुढील तपास ठाणेदार शिवलाल भगत यांच्या नेतृत्वाखाली API विनीत घागे करीत आहे.