
घटी परिवारावर संकट,नुकसान भरपाई-कार्यवाही ची मागणी
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र )
दवलामेटी(प्र):-अमरावती महामार्गावरील दवलामेटी अंतर्गत गणेश नगर ला सोमवारी सकाळी रस्त्याच्या किनाऱ्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारातील प्रवाहित विजेच्या धक्याने 4 म्हशी जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडल्याने अन्यायग्रस्त घटी कुटुंब ,स्थानिक रहिवासी नागरिकांत विद्युत विभागाच्या दुर्लक्षित कार्यप्रणाली विरोधात तीव्र आक्रोश निर्माण झाल्याचे दिसून आले. प्राप्त माहिती नुसार दौलामेटी निवासी कमलाकर घटी वय 59 वर्ष हे आपल्या कुटुंबियांसह निवास करतात.घरी असलेल्या 5 म्हशी व गाई च्या दुधाचा व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवितात. सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे त्यांनी आपल्या 5 म्हशी गोठ्यातून सोडल्या व दूरवर असलेल्या खुल्या मैदानात गवत चरण्यासाठी सोडल्या. या म्हशी काही अंतरावर रस्ताने चालत असताना पोहचल्या असत्या अचानक रस्त्याच्या बाजूला विद्यत तारा खाली पडलेल्या होत्या.व त्यातून सुरू असलेला विद्युत प्रवाह जवळपासच्या जमिनीत ही पसरला होता.
दरम्यान या चारही म्हशी एकामागून एक चालत असताना त्यांचा स्पर्श या ताराना झाल्याने त्या जागीच पडून तडफडू लागल्या व काही वेळाने त्या मृत्युमुखी पडल्या.ही बाब रस्त्याने जाणारे गावकरी व या जनावरांच्या मागे घरून निघालेले पशुपालक कमलाकर घटी यांना समजताच घटनास्थळी धाव घेतली मात्र तो पर्यंत या 5 ही मुक्या जनावरांनी प्राण सोडला होता. म्हशीचे मालक कमलाकर घटी तर दुःखाने रडू लागले.त्यांनी डोळ्यासमोर या त्यांच्या जीवापाड प्रेमाने सांभाळणारे पशु मरून पडलेले होते.
ही बातमी वाऱ्यासारखी गाव व परिसरात समजताच गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. घटना स्थळी सोनेगाव ग्रा.प चे सदस्य युवक काँग्रेस नेते विनोद लंगोटे,सामाजिक कार्यकर्ते संजय कफणीचोर,रोहित राऊत हे पोहचले. येथील दृश्य पाहताच विद्युत विभागाचा व कंत्राटदाराचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्याचे सांगितले.त्यांनी तातडीने विद्युत विभाग,वाडी पोलीस,पंचायत समिती, तहसील विभाग यांना घटनेची माहिती देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली.
घटना सकाळी साढे 9 च्या सुमारास घटून व माहिती मिळून ही घटनास्थळी 2 तासापर्यंत कुणीही सम्बधित यंत्रणेचे अधिकारी -कर्मचारी पोहचले नाही.दुपारी मात्र वाडी च्या पोलीस निरीक्षिका ललिता तोडासे,तलाठी बांबर्डे, सरपंच रीता ताई उमरेडकर , ग्राम पंचायत सदस्य प्रकाश मेश्राम , पशु वैद्यकीय अधिकारी वर्षा ल्हाने घटना स्थळी दाखल झाले.मृतक पशूंचा पंचनामा व उपस्थितांचे बयान नोंदविले.पशुपालक घटी यांनी जवळपास 4 लाख किमतीचे जनावरे दगवल्याचे सांगितले.
व नुकसान भरपाईची मागणी केली.विद्युत अधिकाऱ्यांनी तातडीची मदत म्हणून 10 हजार रु पुढील कार्यवाही साठी दिले.मृत म्हशी पशु विभागाने पोस्ट मार्टम साठी घेऊन गेले.भरपाई व दोषींवर कार्यवाही न केल्यास आंदोलन व गुन्हा दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रोहित राऊत व विनोद लंगोटे यांनी दिला,
यावेळी सामजिक कार्यकर्ते रोहित राऊत, वामन वाहने, दीपक कोरे, देवराव नेवारे, पवन धारूरकर, मिथुन गवई, रोशन मेश्राम, देवानंद औरंगपुरे उपस्थित होते.