
महाराष्ट्र राज्य सरकारची नवीन नियमावली खालील प्रमाणे आहे
1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे (रुमालला मास्क समजले जाणार नाही आणि ती व्यक्ती, दंडास पात्र असेल)
2.जेथे जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा
3. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा
4. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक, डोळे, तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
5. सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच परवानगी,
6. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा. 7. खोकताना किंवा शिंकताना,
टिश्यू पेपरचा वापर करुन तॉड व नाक झाका आणि वापरलेले पेपर नष्ट करा: जर एखाद्याकडे
टिश्यू पेपर नसेल तर त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर
ठेवून खोकाये व शिकावे.
8. सार्वजनिक ठिकाणी थुकू नका.
9. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) राखा.
10. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा.11. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा
प्रवासाच्या 72 तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक.