
नागपूर :-
आज खापा रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. मृतकाचे नाव कोमल गणेश तऱ्हाने असून हा दहेगाव जोशी येथील रहिवासी आहे. अपघात इतका भयंकर होता की कोमल याचा जागीच मृत्यू झाला. समाजसेवक हितेश दादा बनसोड उमेश मोरे राजा फुले यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले पोलिसही घटनास्थळी पोहोचले. मृतक आला शवविच्छेदनासाठी हितेश दादा बनसोडे यांच्या रुग्णवाहिकेने शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहे. बातमी लिहा स्तोवर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद व्हायची होती.