Breaking News

वाघाच्या बंदोबस्तासाठी वनमंत्री यांना दिले निवेदन

 

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने केली वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :-गदगाव परिसरात पट्टेदार वाघ हा दबा धरून बसलेला असल्याने शेतकरी ,शेतमजूर व विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण होऊन भीती निर्माण झाली आहे. तेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चिमूर तालुका अध्यक्ष तथा गदगाव चे सरपंच राजु मुरकटे यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी चे निवेदन वन परिक्षेत्र अधिकारी मार्फत वन मंत्री यांना दिले आहे.

गदगाव, कवठाळा, उरकुडपार, तीरखुरा परिसरात शेतीचे कामे सुरू असून सोनेगाव (बेगडे) येथील देविदास गायकवाड या शेतकऱ्यास शेतीचे कामे करीत असताना वाघाने हमला करून ठार केले.त्या वाघाच्या दहशतीमुळे शेतात काम करणारे शेतमजूर, शेतकरी व विद्यार्थी यांच्यात भीती निर्माण झालेली आहे.अजून पर्यत त्या वाघाचा बंदोबस्त करण्यास वन विभाग अपयशी ठरत असून सोनेगाव( बेगडे) सारखी पुनरावृत्ती घटना घडल्यास वनविभागास दोषी ठरविण्यात येईल असा इशारा देत वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तथा गदगावचे सरपंच राजु मुरकुटे यांनी वनमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी मार्फत निवेदन देत असताना सरपंच राजु मुरकुटे, राका तालुका उपाध्यक्ष रमेश खेरे, शहर अध्यक्ष अनिल रामटेके, रायुका तालुका अध्यक्ष मनीष वजरे, विठ्ठल पेदांम हेमंत समर्थ उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved