
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर– जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथील शेतकरी दगडू कासार या शेतकऱ्याच्या घराला अचानक लागलेल्या आगीत सर्व सामानासह संपूर्ण घर जळून खाक होऊन कुटुंब बेघर झाले होते. भारतीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ताजुदिन शेख जिवती यांनी दगडू कासार यांच्या कुटुंबीयांना तांदूळ, गहू, तेल, मीठ, तिकट साखर,पत्ती ईतर जिवन आवश्यक वस्तूंची मदत केली. तसेच याबाबत सरकारी दरबारीही मदत मिळवून देण्याकरता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.अचानक झालेल्या या घटनेमुळे कासार त्यांचे कुटुंब अत्यंत भयभीत झाले आहे असून घरची परिस्थिती बेताची असल्याने पुढे काय करावे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. आगीत सर्व साहित्य जळाल्याने कासार कुटुंबावार मोठे संकट ओढवले आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग अजगर अली शेख, आम आदमी पक्षाचे गोविंद गोरे,सुनील राठोड, संतोष पोले परमेश्वर राठोस,प्रहार संघटनेचे रुग्णसेवा जीवन तोगरे,तसेच गावातील नागरिक व कासार कुटुंबंय उपस्थित होते.