
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिसी – चिमूर तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने शिवसेना भीसी शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले,शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य नितिन मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख मुकेश जिवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, यांचे मार्गदर्शनात शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने जनसेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी अप्पर तहसील कार्यालय सभागृह येथे संपन्न झाले,
शिबिराचे उद्घाटन चिमुर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे यांचे हस्ते शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, यांचे उपस्थित संपन्न झाले, शिबिरात 140 नागरिकानी तपासणी केली,कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता, शहर प्रमुख नाना नन्दनवार यांचे नेतृत्वात विभाग प्रमुख भाऊराव गोहने, राजेंद्र जाधव, हरीभाऊ बानकर, संजय पडोळे, भूषण साटोने, राजू बाणकर यानी अथक परिश्रम घेतले.
.प्रसिद्धि प्रमुख सुनिल हिंगणकर.