
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – नुकत्याच नागपुर येथे झालेल्या जी टोकु काई कराटे डो स्पर्धे मध्ये नेरी येथील सहा विद्यार्थांनी यश प्राप्त केले.कराटे स्पर्धेचे आयोजन सेन्साई विनोद गुप्ता व सेन्साई शाम भोवते यांनी केले होते .स्पर्धेमध्ये नेरीच्या दहा विद्यार्थांनी भाग घेतला होता त्यापैकी सहा विद्यार्थांनी पदके प्राप्त करुण नॅशनल कराटे चॅम्पीयनशीप गोवा साठी आपले स्थान निश्चित केले. त्यामध्ये ६० ते ६५ वजन गटात मास्टर पंकज चौधरी याने सुवर्णपदक , ५० ते ५५ वजन गटात समिक्षा इन्दोरकर हिने सुवर्णपदक , ४० ते ४५ वजन गटात श्रवरी लाडे हिने सुवर्णपदक,जागृती मास्कोल्हे हिने ६० ते ६५ वजन गटात रजत पदक , कल्यानी मुनघाटे हिने ४५ ते ५० वजन गटान रजत पदक तर राहुल गहुकर याने ५५ ते ६० वजन गटात रजत पदक प्राप्त केले विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय शिफु सुशांत इन्दोरकर , मॉस्टर विशाल इन्दोरकर , मॉस्टर पिपलायन आष्टणकार व आपल्या आई वडलांना दिले. नॅशनल चॅम्पीयनशीप गोवा इथे सिलेक्षण झाल्याने विद्यार्थांचे सर्व स्तरावरूण अभिनंदन होत आहे .