Breaking News

दवलामेटी ग्रामपंचयत चे 4 अपात्र सदस्य स्टे मिळवून ग्रामपंचयत मध्ये दाखल

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)

दवलामेटी (प्र):-अमरावती महामार्ग स्थित ग्रा.प दवलामेटी च्या 4 ग्रा.प सदस्यांना नागपूर जिल्हा प्रशासना ने अपात्र ठरविण्याच्या कार्यवाहीने परिसरात काही दिवसा आगोदर खळबळ पसरली होती.

जेष्ठ ग्रामपंचयत सदस्य प्रकाश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार अपर जिल्हा अधिकारी चा या निर्णयविरोधात ४ ही ग्राम पंचायत सदस्यानी विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे अपील दाखल केली वकील साहिल भांगडे यांनी अपिल कर्त्या तर्फे बाजू मांडली. त्यांचा अपील ला दाद देत विभागीय उपायुक्त धिवरे साहेबांनी स्टे देऊन संबंधीत ग्रामपंचयत सदस्यांना दिलासा दिल्याने.

अपर आयुक्तांकडे सदर प्रकरण सुरु राहणार व पुढील निर्णय येई पर्यन्त ही चार ही सदस्य पदावर स्थाई राहतील.
ग्रा.प सदस् श्रीकांत रामटेके,अर्चना बन्सोड,शुभांगी पाखरे,प्रकाश मेश्राम हे4ही सदस्य पुन्हा पदावर स्थायी झाल्या बद्दल नागरिकांनी त्यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved