Breaking News

प्राथमिक आरोग्य केन्द्रात कोवीड लस खराब झाल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होणार तरी केव्हा ?

= जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन

= कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाइल ने आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लस खराब झाल्या प्रकरणी दोषिवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्ह्या आरोग्य अधिकारी चंद्रपुर यांना तालुका वैधकीय अधिकारी चिमूर यांचे मार्फ़त शिवसेना चिमूर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले, भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्रात १२ ऑक्टोंबर २०२१ ला कर्मचाऱ्यांच्या चूकीमुळे कोवीड १९ चे २७०० डोज ( लस ) खराब झाले होते. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे.

या प्रकरणात येथील वैद्यकीय अधीकारी डॉ. प्रियंका कष्टी व आरोग्य सेवीका शिला कराडे यांची बदली सुध्दा करण्यात आली. परंतु पांच महीन्यांचा कालावधी होऊन सुध्दा आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची फक्त बदली करून गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. या गंभीर प्रकणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून खराब झालेल्या लसीची पूर्ण रक्कम वसुल करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी पत्रद्वारे देण्यात आला,

यावेळी शिवसेना चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे, तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुका प्रमुख राजेंद्र जाधव, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, प्रसिद्धि प्रमुख सुनिल हिंगणकर उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved