Breaking News

वाडीतील वर्दळीच्या मार्गावर महिला वकीलाचा बोलेरो जीप मध्ये सापडून मृत्यू

दत्तवाडी च्या गजानन सोसायटी मध्ये शोककळा

प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी(प्र.):- वाडी महामार्गावरील अनियंत्रित वाहतुकीने पुन्हा एक बळी घेतल्याची सूचना नागरिकांना समजताच शोक व आक्रोश दिसून आला.गजानन सोसायटी प्लॉट क्र.339 निवासी अपर्णा संदीप कुळकर्णी वय 38 वर्ष या विवाहित महिला वकिला ची दुचाकी घरी परत येताना अनियंत्रित झाल्यावर बोलेरो जीप च्या तावडीत सापडल्याने तिचा मृत्यू झाला.सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.
अपर्णा ही नागपूर येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करीत होती.ती विवाहित असुन तिचे पती संदीप कुलकर्णी हे भिलाई येथे वैदयकीय अधिकारी म्हणून कार्य कार्यरत आहेत.तिच्या विवाहाला 3 वर्ष झाले असून ती आपले सासू सासरे यांच्या सोबत राहत होती .नियोजना प्रमाणे तिला काल दुपारी ट्रेन ने पती कडे भिलाई ला देखील जायचे होते ,मात्र मध्येच ही घटना घडली.

वाडी पोलीस व गजानन सोसायटी चे मृतक च्या घराजवळील नागरिक यांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक अपर्णा ही घटनेच्या दिवशी सकाळी काही व्यावसायिक कामानिमित्य नागपूर ला गेली होती व आपले कार्य पूर्ण करून परत दत्तवाडी ला घरी येत होती. अचानक कंट्रोल वाडी बाजार परिसर येथील गुप्ता च्या बिल्डींग समक्ष बेशिस्त वाहतुक व मेट्रो च्या कामा मुळे अनियंत्रित वाहतूकीने दुचाकी चे नियंत्रण बिघडले व ती गाडी सह खाली पडल्याचे समजते.याच दरम्यान अमरावती च्या दिशेला मागून येणारी बोलेरो जीप क्र.MH 30-AB-0832 च्या चालकाला काही समजण्याच्या आत दुचाकी व अपर्णा बोलरोचया चाकात सापडली.अपघाताचा आवाज व चित्र बाजार परिसरसतील नागरिक व दुकान संचालक यांच्या लक्षात येताच मदतीसाठी धाव घेतली.

या अपघातात अपर्णा च्या डोक्याला जोरदार मार लागल्याने रक्तस्त्राव झाला.नागरिकांनी तातडीने वाडी पोलिसांना सूचना देऊन नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.वाडी पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटना स्थळी पोहचून घटना समजून घेऊन पंचनामा केला.व बोलेरो वाहन चालक अजय युवराज सुरवाडे वय 36 वर्ष ला ताब्यात घेतले व वाहतूक सुरळीत केली.व तिचे ओळखपत्र व प्रादेशिक परिवहन विभागातून तिच्या दुचाकी च्या क्रमांकरून ओळख पटवून परिचिताना माहिती दिली.

तिकडे गंभीर जखमी उपचारासाठी दाखल अपर्णा चा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील उपस्थित अधिकाऱ्यांनी घोषीत केले.ही बातमी परिसरात व गजानन सोसायटी स्थित मृतकाच्या घरी पोहचताच हाहाकार व आक्रोश उडाला.परिचित व नातेवाईकाने घटना समजताच सर्वांनी घटनास्थळी व दवाखान्यात धाव घेतली.पोलिसांनी मृतदेहाला नागपूर मेयोला उत्तरीय तपासणी साठी रवाना केले.दुर्घटनेला कारणीभूत बोलेरो चालक अजय सुरवाडे वय 38 ,रा. जामनेर यांच्या वर वाडी पोलिसांनी कलम 279,304 -अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बोलेरो चालकांनी हे सर्व अचानक घडल्याचे सांगितले.मृतक अपर्णा ही आपला व्यवसाय व कुटुंब सांभाळून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हायची. तिच्या या आकस्मिक मृत्यूने परिसरात शोककळा दिसून आली.तर दुसरीकडे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियंत्रण नाही, बाजाराची मार्गावर सतत वर्दळ असते व अपघाताची सतत संभावना असूनही योग्य उपाय दिसून येत नसल्याची खंत नागरिकांनी केली.मृतक अपर्णाचे पती भिलाई वरून तातडीने निघाले असून मंगळवार ला अंत्य संस्कार करण्यात येईल असे परिचितांनी सांगितले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved