Breaking News

ऑफलाईन परीक्षेबाबत युवा सेनेच्या मागनीला येणार यश

= गोंडवाना विधापीठ कुलगुरु सोबत झाल्या सकारात्मक चर्चा

= युवा सेना जिल्ह्या प्रमुख हर्षल शिन्दे व नीलेश बेलखेडे यांची उपस्थिति

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपुर:-गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू डाॅ प्रशांत बोकारे, ,उपकुलगुरू डाॅ श्रीराम कावडे ,परिक्षा-मुल्यमापन नियंत्रक अधिकारी डाॅ अनिल चिताडे यांच्या उपस्थितीत गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली येथे आज कुलगुरू प्रशांत बोकारे यानी चंद्रपूर युवासेनेचे जिल्ह्या प्रमुख हर्षल शिंदे व नीलेश बेलखेड़े यांचे सोबत होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेबद्दल चर्चा करण्या साठी बैठकीला आमंत्रित केले,त्याचप्रमाणे युवासेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या वतीने कुलगुरु प्रशांत बोकारे यांचे समोर काही मुद्दे ठेवण्यात आले त्याच्यावर कुलगुरू सरांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ते त्वरित लागू करू असे आश्वासन दिले तसेच आगामी काळातही गोंडवाना युनिव्हर्सिटी चे कार्य कशा पद्धतीचे असेल याची माहिती दिली,

आणि युवा सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत येतील ते लवकरात लवकर सोडवले जातील याचे आश्वासन दिले,युवासेना जिल्ह्या प्रमुख हर्षल शिंदे व नीलेश बेलखेड़े यानी शाळा महाविद्यालय उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण कमी झाल्याने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्याना अभ्यासक्रम कमी करू परीक्षेचा तान कमी होऊन विद्यार्थ्यांस मदत होईल. कोरोना काळात शाळा महाविद्यालय बंद असल्याने होणारी परीक्षा ही 50% MCQ आणि 50%लेखी स्वरूपात घेण्यात यावी त्यामुळे हुशार तसेच इतर विद्यार्थाला दिलासा मिळून कुणावरही अन्याय होणार नाही, गोंडवना विद्यापीठातील अभ्यासक्रम हा नौकरी मिळण्या संदर्भाचा करून येणाऱ्या काळात उतीर्न विदयार्थी हा कुठल्याही शाखेतील असो त्याला नौकरी मिळावी यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करून रोजगारासाठी कॅम्पस प्लेसमेंट द्यावे,

गोंडवाना विद्यापीठाचा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची माहिती वेळोवेळी देण्यात यावी याकरिता विद्यापीठाचा ऐप तयार करून नवनविन अभ्यासक्रम संदर्भात फायदे हे विभागीय स्तरावर कार्यक्रम लावून सांगावे जेणे करून आदिवासी जिल्ह्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना लाभ घेत येणार. मुलांच्या मार्कशीट, डिप्लोमा आणि डिग्री लवकर मुलांना उपलब्ध करून द्यावा, या विविध मुधावर दोन्ही जिल्ह्या प्रमुखानी चर्चा केली व कुलगुरु यानी त्यांची मागणी मंजूर करत लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved