
गावाचा विकास कामांना आणखी गती मिळावी हेचं मुख्य लक्ष
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-दवलामेटी ग्रामपंचायत क्षेत्रात ७९.०० लक्ष रुपये निधी चे विविध विकासाचा कामांचे भूमिपूजन नुकतेच झाले.
विकासाचा कामांना गती कशी मिळेल यावर आमचा भर असून लवकरच गावाचा सुंदर असा कायपालट आम्ही करू त्यात जिल्हा परीषद सदस्या ममता ताई धोपटे यांचा सहकार्य सत्तत आम्हाला अश्याच प्रकारे मिळेल अशी आम्ही अशा करतो. या प्रसंगी मी ममता ताई धोपटे यांचे खूप खूप आभार मानतो की या विकासात त्यांचा मोलाचा योगदान मिळाला आहे असे,
आणुसुचीत जाती व नवबौध्द घटकांचा विकास करने सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, रस्त्याचे रुंदीकरण, खडगी करणं या सारखे ईतर कामाचे भूमिपूजन प्रसंगी दवलामेटी ग्राम पंचायत सरपंच रीता ताई उमरेडकर बोलतं होत्या.
जिल्हा परिषद सदस्या ममता ताई धोपटे यांचा शुभ हसते भूमिपूजन करण्यात आले . प्रमूख उपस्थिती पंचायत समिती सदस्य सुलोचना ताई ढोके होत्या, कार्यक्रमाला सरपंच रीता उमरेडकर, उप सरपंच प्रशांत केवटे, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव नागरगोजे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाश मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत रामटेके, सिध्दार्थ ढोके, गजानन रामेकर, सतीश खोब्रागडे, अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, साधना शेंद्रे, रक्षा सुखदेवे, अर्चना चौधरी, रश्मी पाटील, छाया खिल्लारे, शकुंतला अभ्यंकर, शितल वानखेडे, उज्वला गजभिये तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनिता वाटकर, प्रविण उमरेडकर, संदेश गवई व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थीत होते.