Breaking News

पंचायत समिती नागभीड विभाग येथे मोठा घोळ

जे.के राऊत ग्रामसेवक यांनी दिली ऑडिटर ला खोटी माहिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

ब्रम्हपुरी:-जे.के राऊत हे १६ वर्षांपासून नागभीड येथे सन २७/११/१९९० पासून ते ११/०८/२००६ पर्यंत ग्रामसेवक पदावर कार्यरत असतांना (१) ग्राम पंचायत वलनी , (२) ग्राम पंचायत सावरगाव , (३) ग्राम पंचायत मींडाळा , (४) ग्राम पंचायत वासाळा मेंढा , (५) ग्राम पंचायत तळोधी बाळापूर , (६) ग्राम पंचायत कन्हाळगाव या ग्राम पंचायत चे ग्राम सेवक म्हणून कारभार सांभाळणारे जे.के.राऊत यांनी ग्रामस्थांच्या विकासाची भाकर करीत विकास खोळंबून जनतेची दिशाभूल करण्याचे कार्य केले.

याची माहिती हि माहिती अधिकार २००५ अन्वये मागितली गेली त्यामध्ये ऑडिटर लेखा परीक्षक स्थानिक निधी लेखा चंद्रपूर यांनी केलेल्या तपासाअंती वसुलपात्र रकमा जवळपास १५ लाख ईतका घोळ व आक्षेपाधिन रकमा जवळपास ५० लाख रुपयांचा घोळ यावरून स्पष्ट झाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) यांनी अजूनही या सर्व बाबी बघितले असता कारवाई न करता बंद बस्त्यात हे प्रकरण ठेवले असून यावर कारवाई करणार तरी केव्हा ? याची ग्रामस्थांना आस लागली आहे.

असा प्रकार दैनंदिन या जे.के.राऊत या अधिकाऱ्यांमार्फत सुरूच राहिल याची कल्पना करावी तेवढी कमी आहे.म्हणून गांभीर्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड , तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी दखल घेणे आवश्यक आहे.जे.के राऊत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यास अजूनही शासन पदोन्नती जाहीर करून विस्तार अधिकारी पद दिला जातो हि गंभीर बाब असून गुन्हे लपविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यास सहकार्य करीत आहेत हे यावरून सिद्ध होते. म्हणून ब्रम्हपुरी पंचायत समिती येथील स्थानिक नागरिक तसेच ग्रामस्थ यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved