Breaking News

सामान्य परिचर्या व प्रसुतीशास्त्र अभ्यासक्रमासाठी महिला उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

24 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 23 जून : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. 1 ऑगस्ट 2022 पासून सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाकरीता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने विहित प्रपत्रामध्ये अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची मुदत दि. 24 जून 2022 पर्यंत असणार आहे.

तरी, चिमूर प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड व ब्रह्मपुरी या पाच तालुक्यातील ईच्छुक महिला उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे चिमूर,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक …

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी केला गुणवंतांचा सत्कार

पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जागतिक पर्यावरण दीन व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved