
भादूर्णा गावा चा पहिला नवोदय विद्यार्थी,गावात आनंदाचे वातावरण
प्रतिनिधी -कैलास राखडे
सिंदेवाही:-जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे
नवोदय ची परीक्षा ही परीक्षा पालक व शिक्षकांसाठी प्रतिष्ठेची परीक्षा असते या परीक्षेत सर्वोदय विद्यालय सिंदेवाही चा विध्यार्थी मंथन अरविंद मोहूर्ले याने उत्कृष्ट यश संपादन केलेअसून त्याचे मूळ गाव भादूर्णा तहसील मूल येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
मंथन मोहूर्ले हा भादूर्णा गावातून जवाहर नवोदय परीक्षा उत्तीर्ण करणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे,,
मंथन हा सिंदेवाही सहकारी भात गिरणी चे व्यवस्थापक अरविंद गणपतराव मोहूर्ले यांचा मुलगा असून त्याने आपल्या यशाचे श्रेय आई,बाबा,शिक्षक आणि मित्र मंडळींना दिले आहे,