
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.चिमूर तर्फे राबविण्यात आली होती निवडणूक प्रक्रिया
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – मा. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयीन पत्र क्र. रासनिप्रा/कक्ष-१२/ड-वर्ग ९ निनिअ नियुक्ती/५३५५/२०२२ दिनांक २८/०६/२०२२ नुसार को.मा.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य गुणे यांचे कार्यालयीन पत्र क्र. रासनिप्रा/कक्ष-१२/ड वर्ग निनिअ नियक्ती/५३५५/२०२२ दिनांक २८/०६/२०२२ नुसार वाल्मीक मच्छिमार सहकारी संस्था मर्या चिमूर रजी.नं.२०७ तालुका चिमुर जिल्हा चंद्रपुर या संस्थेचे निवडणूक अधिकारी व निवडणूक दिनांक जाहिर केलेला असल्याने तसेच वरील वाचा क्र. ०१ नुसार मा.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पूणे यांचे अधिमंडळाची पंचवार्षिक सभा घेण्याकरिता आर.ए.अवझे निवडणूक निर्णय अधिकारी याची नियुक्ती करण्यात आली होती.
दिनांक १४/०३/२०२२ गुरुवारला दुपारी ठिक ४.०० वाजता संस्थेच्या कार्यालयात हि निवडणूक आयोजीत करण्यात आली होती. सदर निवडणूक कार्यक्रमात नमुद कार्यक्रमातील वेळेनुसार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल.
असे प्रत्येक सभासदांना संस्थेमार्फत पत्र देण्यात आली होती.व सर्व संस्थेचे सभासद निवडणूक कार्यक्रमास आयोजित वेळेवर उपस्थित होते.परंतु आर.ए.अवझे निवडणूक निर्णय अधिकारी हे पत्रात दिलेल्या वेळेनुसार वेळेवर कुठलाही अधिकारी संस्थेच्या कार्यालयात हजर झाला नाही.त्यामुळे संपूर्ण सभासद हा कसला प्रकार आहे.निवडणूक म्हणतांना नियमानुसार वेळेच्या अगोदर अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असतांना चक्क दिड तास उशिरा संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचा संच त्याठिकाणी हजर झाला.व पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरु झाली त्याकरिता उमेदवाराचे नाव सुचवणे हि प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये महिला पुरुष असे दोन्ही मिळून ९ उमेदवारांना निवडणूक द्यायचे होते.
परंतु उमेदवारांचे संख्याबळ ९ पेक्षा जास्त प्रमाणात २० च्या वर असल्याने व सभासदांची एकूण संख्या १६८ असल्याने त्यातील २ सभासदांची नावे संस्थेच्या सचिवांच्या हाताने यादी तयार करतांना सुटली असून यावरही गदारोळ करण्यात आला असता २ सभासदांना निवडणूकिस मतदानापासून वंचित राहावे लागेल हे नियमबाह्य असतांना त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले.व १६८ सभासदांपैकी १६६ सभासदांची यादी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,(दुग्ध) चंद्रपूर या कार्यालयात पाठविण्यात आली.
त्यानुसार निवडणूकिला सुचकांनी उभे केलेल्या उमेदवारास सर्वांना अनुमोदन करणे उपस्थित ९० सभासदांना पहिल्यांदाच आश्चर्यकारक ठरले व सभासदांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना या निवडणुकीचा विरोध करीत गोपनीय निवडणूक घेण्यात यावी याची मागणी केली. हि प्रक्रिया रात्री ०७:१५ पर्यंत चालली सभासदांचा गोंधळ आवरेनासे झाल्याने सभासदांनी केलेल्या गोपनीय निवडणूकिस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मान्यता देत निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला.