Breaking News

चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर,दि. 16 सप्टेंबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची MH34-CD-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. वाहनधारकांना आपल्या वाहनाकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्जदाराने पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत, क्रमांकानुसार विहित केलेले शासकीय शुल्क, डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,चंद्रपुर यांच्या नावे विहित शुल्क रकमेचा भरणा मालिका सुरू झाल्यानंतर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावे. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यानंतर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. मालिका सुरू असताना वाहन-4 प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर बंद करण्यात येईल.

प्राप्त होणारे अर्ज दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयांमध्ये स्वीकारले जातील. 19 सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास, अर्जदाराने 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत चौकशी करावी. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचे धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सायंकाळी 4.30 पर्यंत बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved