
गावात घोणस अळीची शेतकऱ्यांत दहशतच
पहिली घटना घडून अधिकारी गावात पोहचलेच नव्हते, तर दुसऱ्या घटनेच्या वेळी अधिकारी पोहचले गावात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे घोणस अळी ने थैमान घातले असून तीन दिवसात दुसरी घटना सावरी (बिडकर) येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली आहे, सावरी येथील शेतमजूर रामकिशन पत्रुजी सोनवाणे (वय 55 वर्ष) हा गावात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर सकाळी गेला होता. यावेळी रस्त्यावर आलेले झाडांच्या फांद्या तोडत होता. झाडांच्या फांद्या तोडत असतांना फांदीला हात पकडताच या घोणस अळीने चावा घेतला हाताला चावा कश्याने घेतला याबाबत पाहणी केली असता घोणस अळी झाडांच्या फांदीवर असल्याचे दिसून आले. यावेळी रामकिशन यांनी गावात माहिती दिली असता गावातील नागरिकांनी रामकिशन ला तत्काळ सावरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून वैद्यकीय अधिकारी यांनी अळीने चावा घेतलेल्या रामकिशन वर ओषोधोपचार केला असून रामकिशन ची तब्येत धोक्याबाहेर असून प्राथमिक आरोग्य केंद्र सावरी येथेच उपचारा सुरू आहे,
चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे घोणस अळीने थैमान घातले असून तीन दिवसातील दुसरी घटना घडली चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे घोणस अळीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर मध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यात सोयाबीन, कपाशीची शेतकऱ्यांनी लागवड केली. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतात असलेले पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू असतांना सोयाबीनला शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कपाशीवर बोडअळीचा आक्रमक सुरू आहे. त्यामुळे पाहीजे तसे उत्पादन होईल की नाही, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर गावांमध्ये घोणस अळी आढळून येत आहेत त्यामुळे शेतक-यांसह मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ही अळी पिकांचे नुकसान करीत असली तर नकळत घोणस अळीचा मानवी शरीराला स्पर्श झाला की शरिराला वेदना मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे घोणस अळीमुळे पुन्हा एकदा शेतकरी शेतमजूर चिंतेत सापडले असून चिमूर तालुक्यात घोणस अळीने चावा घेतल्याची दुसरी घटना घडली आहे.
प्रहार सेवक विनोद उमरेनी घेतला क्रुषि अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार
सावरी बीड येथे 21 सप्टें बुधवार ला एका महिलेचा घोणस अळीला स्पर्श झाल्याने तब्येत खालावली होती गावात घटना घडून याबाबत व्रुतपत्रात बातमी झळकून सुध्दा क्रुषि अधिकारी गावात पोहचलेच नव्हते त्यामुळं प्रहार सेवक विनोद उमरे यांनी घटना घडून तीन दिवसात दुसरी घटना घडली तेव्हा अधिकारी गावात पोहचले असल्याने आलेल्या अधिकाऱ्याना विचारणा केली असता गुरवारला मिटींग असल्यामुळं गावात येणं झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी विनोद उमरे यांना सांगितले असता गावातील शेतमजुरांचे जीव गेल्यावर गावात याल काय असा खरपूस समाचार आलेल्या अधिकाऱ्याचा घेतला असल्याची माहिती प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दैनिक पुण्यनगरी जवळ सांगितले.
ती अळी तपासणीकरिता प्रयोगशाळेत
आज गावात आलेल्या क्रुषि पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली असून ती अळी क्रुषि विभागाणी ताब्यात घेऊन तपासणी करिता प्रयोग शाळेत पाठ्विणार असल्याची माहिती मिळाली आहे.