
शिवसेनेचा निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर क्रांती भूमी उमा नदीच्या तीरावर वसलेली असून याच नदीवरून चिमूर नगरीत पिण्यासाठी पाणी पुरवठा होते, नगर परिषद स्थापनेनंतर याच नदीच्या काठावर घन कचरा डंपिंग यार्ड तयार केले होते, या डंपिंग यार्ड वर कचरा असल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून नदीचे पात्र प्रदर्शित झाले आहे, त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे, या संदर्भात सात दिवसाच्या आत डंपिंग यार्ड वरील घनकचऱ्याचे विल्हेवाट करण्यात आले नाही तर चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नगर परिषद अधीक्षक प्रदीप रणखांब यांचे मार्फत मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांना दिले आहे,
चिमूर नगर परिषद तर्फे शहरातील दुर्गंधी रोखण्यासाठी खरकाडा येथे जागा खरेदी करून नवीन डंपिंग यार्ड तयार करण्यात आले, पण जुन्या डंपिंग यार्ड वरील कचरच्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही, जुना कचरा जस्याच्य तसा असून त्या ठिकाणी आता मेलेली जनावरे, मास, कोंमडी, बकरी यांचे आतडे टाकले जात आहे, परिणामी याची दुर्गंधी पसरून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे, या दुर्गंधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, देश विदेशातील पर्यंटकाणा तथा सेलिब्रिटीना ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भ्रमंतीला याच मार्गाने जावे लागते, तेव्हा पर्यटकांना सुधा या मार्गावरून जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे,
त्यामुळे उमा नदीवरील डमपीग यार्ड ताबडतोब हटविण्यात यावे अण्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेनाद्वारे नगरपरिषद ला निवेदनाद्वरे दिला आहे, या वेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, तालुका संघटक रोशन जुमडे, शहर प्रमुख सचिन खाडे युवा सेना उपजिल्हा प्रमुख राज बूचे, युवा सेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, राकेश नामे प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर उपस्थित होते,