
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर तर्फे दिले उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.२९ सप्टेंबर २०२२ ला दोन अवैध रेती माफियांनी चिमूर येथील जुना बसस्टॉप याठिकाणी येऊन
विलास मोहीनकर पब्लिक पंचनामा साप्ताहिक वृत्तपत्राचे उपसंपादक तसेच चंद्रपूर सर्च टिव्ही चे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर चे चिमूर तालुका संघटक यांना नामे १) भुषण सातपुते २) गोलु ऊर्फ हर्षद भरडकर या दोघांनी मिळून अपशब्दात शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
यामुळे विलास मोहीनकर यांना त्यांच्यापासून जिवीताचा धोका निर्माण झालेला आहे. करीता अनुचित प्रकार घडु शकण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपले स्तरावरुन अवैध रेती व्यवसायीकांवर उचित कारवाही करावी.सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन चिमूर येथे दिली असता पोलीस विभागाने दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ५०४, ५०६ अदखल पात्र गुन्हयाची नोंद केली असुन हे आम्हाला योग्य वाटत नाही. अशाप्रकारे पुढे पत्रकारांवर हल्ले घडु नये, याकरिता उचित कारवाही करण्यात यावी.
याकरिता आज दिनांक -३०/०९/२०२२ ला प्रशासकीय भवन चिमूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई – शाखा चंद्रपूर तसेच डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.यावेळी जितेंद्र चरोडिया , केवलसिंग जुनी ,सूरज नरुले , श्रीहरी सातपुते , जावेद पठाण , सुनिल कोसे ,संजय नागदेवते ,सुनिल हिंगणकर , रोशन जुमडे , प्रमोद राऊत , आशिष रेच व आदींची उपस्थिती होती.