Breaking News

15 ऑक्टोबरपासून चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे क्रमाक्रमाने होणार बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 12 ऑक्टोबर : वैनगंगा नदीवर, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर यांनी मंजूर केलेल्या द्वार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेजचे 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.

त्याकरीता दि. 15 ऑक्टोबर 2022 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार, प्रथम नदीकाठावरील व क्रमाक्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात ऊर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होऊन नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. नदी व नाल्यातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ नये म्हणून सर्व लगतची गावे व ग्रामपंचायतींनी आपल्या गावकऱ्यांना याबाबत दवंडीद्वारे सूचित करावे. तसेच नदीकाठावर जाणे टाळण्याच्या, नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात.

या कार्यालयाकडून ज्या शेताचे भूसंपादन, सरळ खरेदी करण्यात आली आहे व येत आहे, त्या सर्व भूधारकांनी शेतातील कामे करतांना खबरदारी घ्यावी किंवा या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादित केलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करू नयेत. तसेच मासेमारी करणारे, पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये, रेती घाटातून रेती काढणारे, नदी पात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस लघु पाटबंधारे विभाग हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असे लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदीकाठावरील गावे:

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदी काठावरील गावांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, चामोर्शी तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायत अंतर्गत कुरुड व रामपूर, विसापूर ग्रामपंचायतीअंतर्गत विसापूर, निमगाव, खोर्दा व हिवरगांव तसेच तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव (रै), आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, डोटकुली तर गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव(बु.), शिवणी, मुडझा व पुलखल आदी गावे तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याअंतर्गत हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेंगाव, कापसी व उपरी आदी गावांचा समावेश आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved