
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता पाटबंधारे दिना विश्रामगृह येथे पर्यावरण संवर्धन व विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डी के आरीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली , यात महाराष्ट्र प्रदेश महासचिव या पदावर माननीय निशाताई धोंगडे यांची निवड झाली तर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष महिला विंग या पदावर माननीय स्वातीताई दुर्गमवार यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदावर माननीय खेमचंद मेश्राम तर हंसराज वनकर व श्रीनिवास गोसकुला यांची नियुक्ती जील्हा सचिव या पदावर करण्यात आली. यावेळी दलित मित्र व आदिवासी सेवक तसेच,
समितीचे संस्थापक अध्यक्ष माननिय डी के आरिकर साहेब, प्रदीप अडकिने , दिनेश एकवणकर , खेमचंद मेश्राम, श्रीनिवास गोस्कूलला, खेमचंद मेश्राम, सुधाकर मोकदम, महेंद्र शेरकी , हंसराज वनकर , प्रवीण जुमडे ,सौ. निशाताई धोंगडे स्वातीताई दुर्गमवार, सौ. शिल्पाताई कांबळे सोबत अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
पर्यावरण संवर्धन व विकास समिती संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. येथे पर्यावरण संवर्धन व विकासाच्या दृष्टीने सेवाभावी वृत्ती आणि सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून कार्य केले जातात.यासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन समाजासाठी व स्वतःसाठी पुढाकार घेणाऱ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदन देण्यात आले.